बुलढाणा: आजवर उपेक्षेचा बळी ठरलेल्या येथे कार्यरत मॉडेल डिग्री महाविद्यालयासाठी तब्बल ८३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी पाठपुरावा करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी येथेच अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

शैक्षणिकदृष्ट्या मागास १६ जिल्ह्यांसाठी २०११ मध्ये मॉडेल कॉलेज मंजूर करण्यात आले होते. यात बुलढाण्यातील महाविद्यालयाचाही समावेश होता. मात्र अनेक वर्षे उपेक्षित राहिल्याने ते खाजगी इमारतीत सुरू राहिले. काही वर्षांपूर्वी बिरसिंगपूर (ता. बुलढाणा) नजीक जागा मिळाली. मात्र सुसज्ज इमारतीची समस्या कायम राहिली.

हेही वाचा : गोंदिया : चिचगावटोल्यातील निर्माणाधीन जलकुंभ जमीनदोस्त, कारण काय? जाणून घ्या..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ही बाब लक्षात घेऊन आमदार गायकवाड यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे महाविद्यालयाच्या इमारतीसाठी ८३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाविद्यालयामध्ये अमरावती विद्यापिठाचे उपकेंद्र देखील मंजूर करण्यात येणार आहे. विद्यापिठाअंतर्गत शिकविले जाणारे सर्व विषय या ठिकाणी शिकविल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणीच दर्जेदार शिक्षण मिळेल. येत्या दोन महिन्यांत इमारत बांधकामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती आमदार गायकवाड यांनी दिली आहे.