लोकसत्ता टीम

नागपूर: विदर्भातील काही मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रथम उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार माझ्यासह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले. आता मनसेकडून काही कारण नसतांना तेथे भाजपला पाठिंबा दर्शवला गेला. त्यामुळे राज ठाकरे यांनी वैदर्भियांची फसवणूक केली आहे. या प्रकरणांत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप, हिंगणा विधानसभेचे उमेदवार बिजाराम किनकर यांनी केला.

Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?

प्रेस क्लबमध्ये शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बिजाराम किनकर पुढे म्हणाले, हिंगणा विधानसभा मतदारसंघ मागील अनेक वर्षांपासून सातत्याने मनसे पक्ष वाढवण्यासाठी काम केले. यंदाच्या निवडणूकीत येथे बुथ पातळीवर पक्षाची यंत्रणा उभारून हा मतदारसंघ मनसेसाठी अनुकुल केला. त्यानुसार स्वत: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंगणातून मला उमेदवारी जाहिर करत एबी फार्मही दिला. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करून मला चिन्ह मंजूर झाले.

आणखी वाचा-“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका

दरम्यान काही दिवसांपूर्वी अचानक मनसेकडून समाज माध्यमांवर येथून भाजपचे उमेदवार समीर मेघे यांना पाठिंगा दिल्याचे पत्र व्हायरल झाले. मला स्वत: मनसेप्रमुख राज ठाकरे अथवा इतर एकाही वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला माघार घेत भाजपला समर्थन देण्याबाबत संपर्कही केला नाही. येथील स्थानिक मनसे नेत्यांकडून याबाबत जूजबी चर्चा केली. विदर्भातील इतरही काही जागेवर हा प्रकार घडला असून आणखी काही भागात घडण्याची शक्यता माझ्या कानावर आली आहे.

दरम्यान एकेकाळी आम्हाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वत: लढणार असल्याचे सांगत कामावर लावले. परंतु अचानक कारण नसतांना भाजपला पाठिंबा देण्याच्या प्रकरणात राज ठाकरे यांनी वैदर्भियांची फसवणूक केलेली दिसत आहे. या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचीही शंका नकारता येत नाही. त्यामुळेच माझ्यासारख्या जिंकून येणाऱ्या उमेदवाराला अचानक माघार घेण्यासाठी स्थानिकांकडून दबाव तयार करण्याचे कारण काय? हा प्रश्नही बिजराम किनकर यांनी केला. परंतु मी माघार घेणार नसून येथून मनसेच्या इंजिन चिन्हावर निवडणूक लढून जिंकणार असल्याचेही किनकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…

हिंगणातील उद्योग गुजरातला पळवले

हिंगणा परिसरात बऱ्याच औद्योगिक वसाहती आहे. त्यामुळे या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरचे उद्योग आले असून आणखी काही येऊ इच्छित आहे. परंतु हे उद्योग मोठ्या प्रमाणात गुजरातला पळवले गेले असून सत्ताधारी आमदारांसह सरकार केवल तमाशा बघत आहे. दुसरीकडे हिंगणातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगांना घेण्यात आले असून स्थानिक तरुणांवर अन्याय होत असल्याचाही आरोप बिजराम किनकर यांनी केला.

Story img Loader