वर्धा : आपत्ती काळात नागरिकांना सावध करण्यासाठी एकात्मिक ईशारा प्रणाली विकसित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. देशात आपत्ती आल्यास नागरिकांच्या मोबाईलवर संदेश येतात. कधीकधी त्यामुळे शंकाही उपस्थित होतात. त्यामुळे पाठविले जाणारे आणीबाणीचे संदेश व्यक्तीच्या गोपनियतेला बाधा निर्माण करतात का, असा प्रश्न खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला. तसेच मोबाईल निगडीत अलर्ट सेवा आहेत का, असाही उपप्रश्न होता.

त्यावर उत्तर देताना केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री डॉ. देवूसिंह चव्हाण यांनी स्पष्ट केले की आपत्ती व्यवस्थापनात दूरसंचार तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडते. गृह व दळणवळण मंत्रालयाने एकत्रितपणे येणाऱ्या आपत्तीबद्दल सावध करण्यासाठी एकात्मिक ईशारा प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचा वापर करून नागरिकांना सतर्क करण्यासाठी लघुसंदेश सेवा उपयोगात येते. ऑगस्ट २०२१ पासून ही प्रणाली सर्व राज्ये तसेच केंद्र शासीत प्रदेशात कार्यरत आहे.

हेही वाचा – पेपरफुटीबाबत कायद्यासाठी अभ्यास समितीची घोषणा

हेही वाचा – मुंबई : अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत एकूण १ हजार ३५९ कोटी एसएमएस पाठविण्यात आले आहे. आपत्ती जागरूकता अधिक सुधारण्यासाठी दोनही मंत्रालयांनी सहकार्य केले आहे. ही प्रणाली स्वदेशी पद्धतीने तयार केली असून सर्वसमावेशक चाचणी करून कार्यान्वित केली आहे. माहितीचा प्रसार सुनिश्चित करण्यासाठी तसेच जीवितहानी टाळण्यासाठी ही प्रणाली तयार झाली. मुख्य म्हणजे सामान्य नागरिकांच्या गोपनियतेला प्रणालीपासून कोणताही धोका नसल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या उत्तरातून स्पष्ट केले.