Central Railways To Launch 150 Special Trains For Festive Season Rush: प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव हंगामात मध्य रेल्वेने विविध ठिकाणांवरून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नागपूर – पुणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरच्या दरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. नागपूर – पुणे – नागपूर साप्ताहिक विशेष गाडीच्या २० सेवा होणार आहेत. ०१२०९ विशेष सेवा २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल.

या गाडीच्या १० सेवा होतील. ०१२१० रेल्वे गाडीच्या विशेष सेवा २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. या गाडीच्या देखील १० सेवा होतील. उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे गाडीला थांबा राहणार आहे. चार वातानुकूलित ३-टियर, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय, दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी गाडीची संरचना राहील.

लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडीच्या २० सेवा होणार आहेत. ०२१३९ साप्ताहिक सुपरफास्ट विशेष २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथून ००.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. गाडीच्या १० सेवा होतील. ०२१४० साप्ताहिक सुपरफास्ट विशेष २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी नागपूर येथून १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. या गाडीच्या देखील १० सेवा होणार आहेत.

या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा आहे. तीन वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय, २ सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहील. पुणे-नागपूर विशेष गाडीचे आरक्षण विशेष शुल्कासह ०८ सप्टेंबरपासून, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष गाड्यांचे आरक्षण ०९ सप्टेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर सुरू होईल.