लोकसत्ता टीम

नागपूर : ठाणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता असून कोकणाला “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज रविवारीही राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, मध्य महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यातही आज वरुणराजा बरसणार आहे. हवामान खात्याकडून कोकण विभागाला “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आणखी वाचा-सप्टेंबरमध्ये मुसळधार, ‘आता ऑक्टोबर हिट’साठी तयार रहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण कोकण-गोवा किनार्‍यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा उत्तर-ईशान्येकडे सरकला असून ३० सप्टेंबरला दक्षिण कोकण किनार्‍याजवळील पूर्वमध्य अरबी समुद्रावर साडेपाच वाजता केंद्रीत झाला. आज रात्रीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कोकण-गोवा किनारा, पणजी ते रत्नागिरी दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे.