scorecardresearch

Premium

महाकाली महोत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चंद्रपूरात येण्यासाठी निमंत्रण पत्रिका

महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यांना माता महाकाली महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली आहे.

mahakali mata mahotsav samiti chandrapur, cm eknath shinde, invitation to cm eknath shinde, mahakali festival chandrapur
महाकाली महोत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चंद्रपूरात येण्यासाठी निमंत्रण पत्रिका (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : नवरात्री दरम्यान श्री. माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ऑक्टोबर पासून सुरु होणार असलेल्या या महाकाली महोत्सवाकरीता श्री. महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली असून महोत्सवादरम्यान माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपूरात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यावेळी श्री. महाकाली माता महोत्सव समीतीचे अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, कोषाध्यक्ष पवन सराफ, सदस्य मधुसुदन रुंगठा, अशोक मत्ते, मिलींद गंपावार, राजू शास्त्रकार, कुक्कु सहाणी, मोहित मोदी यांची उपस्थिती होती.

चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती राज्यभरात पोहोचावी, येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून मागच्या वर्षीपासून चंद्रपूरात श्री. माता महाकाली महोत्सवाला सुरूवात करण्यात आली आहे. मागच्या वर्षी या महोत्सवाला नागरिकांचाही उस्फुर्त प्रतिसाद लाभला होता. यंदाही १९ ऑक्टोबर पासून महाकाली मंदिराच्या पटांगणात श्री. माता महकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सदर आयोजन पाच दिवस चालणार असून धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांनी महोत्सवात रंगत भरणार आहे. तर २३ ऑक्टोबरला श्री माता महाकालीची भव्य नगर पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.

asha workers protest at ajit pawar s bungalow
नागपूर: आशा स्वयंसेविकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यापुढे ठिय्या आंदोलन, मागणी पूर्ण होईस्तोवर…
tejashwi yadav janvishvas yatra
दहा दिवस अन् ३३ जिल्हे! NDA ला रोखण्यासाठी RJD ची ‘जनविश्वास यात्रा’; तेजस्वी यादव यांना यश येणार का?
sugarcane bill amount
ऊस बिलाच्या रकमेसाठी मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात काळे झेंडे दाखवणार, राजू शेट्टी यांचा इशारा
Kumari anty food stall
रस्त्यावरच्या फुड स्टॉलवरील कारवाई रोखण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; कोण आहेत कुमारी आंटी

हेही वाचा : हिमसागर एक्सप्रेस प्रवाशांची की दारु विक्रेत्यांची? मोठा साठा सापडला

दरम्यान काल गुरुवारी श्री. महाकाली माता महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यांना माता महाकाली महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या महोत्सवात उपस्थिती दर्शविणार असल्याचे म्हटले आहे. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार आणि समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुनरी व माता महाकालीची मुर्ती भेट स्वरुपात दिली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrapur shri mahakali mata mahotsav samiti gives invitation to cm eknath shinde for the festival starting from 19 october rsj 74 css

First published on: 06-10-2023 at 09:34 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×