अमरावती : विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात विदर्भाला न्याय मिळवून देण्याचे काम करण्यात आले, पण महाविकास आघाडी सरकारने या मंडळाकडे दुर्लक्ष करून विदर्भावर अन्यायच केला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सायंकाळी येथे केला.

विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ परिणय बंध सभागृहात आयोजित पदवीधर मतदार मेळाव्यात ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, जेव्हा चैनसुख संचेती हे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांची सिंचन, रस्ते, वीज, आरोग्य या प्रश्नांवर विदर्भातील अनुशेषाचा अभ्यास करून वेळोवेळी अहवाल सादर केले. सुदैवाने त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. विदर्भाचे अनेक भाजप आमदार, मंत्री पोटतिडकीने विदर्भाचे प्रश्न विधिमंडळ सभागृहात मांडत होते. अनुशेषाचा विषय जेव्हा मांडण्यात येत होता तेव्हा सरकारकडून भरभरून निधी मिळत होता, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या काळात विदर्भावर दुजाभाव करण्यात आला. गेल्या अडीच वर्षांच्या काळात तर विदर्भावर मोठा अन्याय झाला. विदर्भ वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देखील देण्याचे काम झाले नाही, असे बावनकुळे म्हणाले.

ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
amit shah
महाराष्ट्राला काय दिले, पवारांनीच हिशेब द्यावा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात

हेही वाचा – सुनील केदारांची भाजपच्या दुटप्पी धोरणावर टीका, म्हणाले, ” ‘आरएसएस’ कार्यकर्त्यांना पेन्शन, मग शिक्षकांना का नाही?”

डॉ. रणजीत पाटील हे एक अनुभवी नेते आहेत. विधिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम करताना आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांचा अभ्यास आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप नेतृत्वातील सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा एकही शब्द रिकामा जाऊ देणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

गेल्या बारा वर्षांमध्ये डॉ. पाटील यांनी एखाद्या निष्णात वकिलाप्रमाणे पदवीधरांचे प्रश्न सभागृहात मांडले, ते तडीस नेण्याची क्षमता दाखवली, त्यामुळे ते सहजपणे निवडून येतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – सरकार कोसळण्याच्या पटोलेंच्या दाव्यावर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आणखी २० आमदार…”

मेळाव्याला आमदार संजय कुटे, प्रवीण पोटे, प्रताप अडसड, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, तुषार भारतीय, शिवराय कुळकर्णी आदी उपस्थित होते.