राज्यातील १६ लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले असून विदर्भातील चंद्रपूर व बुलढाणा या दोन लोकसभा मतदार संघाचा यात समावेश आहे. २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान चंद्रपूर लोकसभा प्रभारी केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी चंद्रपूर जिल्ह्याच्या दोऱ्यावर येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

हेही वाचा >>> नागपूर : रेल्वेच्या ‘लोको पायलट’ने हॉर्न वाजवला परंतु प्रेमी युगुल रुळावरून बाजूला झाले नाही अन क्षणार्धात…

विश्राम गृह येथे आयोजित पत्र परिषदेत बावनकुळे यांनी आगामी २०२४ लोकसभा निवडणूक बघता भाजपने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती दिली.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार बंटी भांगडिया, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी आमदार संजय धोटे, अतुल देशकर यावेळी हजर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.