scorecardresearch

नागपूर : रेल्वेच्या ‘लोको पायलट’ने हॉर्न वाजवला परंतु प्रेमी युगुल रुळावरून बाजूला झाले नाही अन क्षणार्धात…

२५ वर्षीय तरुण आणि २२ वर्षे वयोगटातील तरुणी हे दोघेही गुमगाव रेल्वेस्थानकापासून एक किमी अंतरावर रेल्वे रुळावर उभे होते.

indian-railway
( संग्रहित छायचित्र )

: एका प्रेमी युगुलाने हिंगणा परिसरातील गुमगाव रेल्वेस्थानकापासून एक किमी अंतरावर धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. वृत्त लिहिस्तोवर या प्रेमी युगुलाची ओळख पटली नव्हती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुण आणि २२ वर्षे वयोगटातील तरुणी हे दोघेही गुमगाव रेल्वेस्थानकापासून एक किमी अंतरावर रेल्वे रुळावर उभे होते.

या दरम्यान दुरंतो एक्स्प्रेस येत होती. ‘लोको पायलट’ने जोरजोरात हॉर्न वाजवला. परंतु, दोघेही रुळावरून बाजूला झाले नाही. क्षणार्धात दोघांनाही भरधाव रेल्वेने धडक दिली. या धडकेत दोघांनाही जवळपास ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले. दोघांच्याही शरीराचे अनेक तुकडे झाले.
माहिती मिळताच हिंगण्याचे ठाणेदार विशाल काळे हे पथकासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी दोघांचेही मृतदेह मेडिकलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले.

हेही वाचा : गडचिरोली : प्रखर विरोधानंतरही वन विभागाने पातानीलमधील तीन हत्ती मध्यरात्रीच गुजरातकडे केले रवाना

प्रेमी युुगुल आत्महत्या करण्यासाठी आले होते की त्यांचा रेल्वेसमोर फेकून खून झाला, असा संशय निर्माण झाला आहे. मृत प्रेमी युगुलाबाबत मोबाईलद्वारे काहीतरी माहिती पोलिसांना मिळवणे शक्य होते. मात्र, दोघाचेही मोबाईल पूर्णपणे फुटले आहेत. प्रेमी युगुलाच्या पायाला दोरी बांधलेली होती. त्यामुळे त्यांचा अपघात की घातपात असा संशय आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-09-2022 at 11:28 IST
ताज्या बातम्या