नागपूर : समाजात बेईमानी होत असेल तर निसर्ग बदला घेतो. आताही तेच झाले आहे. बेईमानी करुन आलेल्या सरकारचा बदला निसर्गाने घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे निसर्गानेच आणले आहे, असे प्रतिपादन भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

हेही वाचा… ‘..राज्यपाल झाले भाज्यपाल.., महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे’; विधानभवन परिसरात विरोधकांच्या घोषणा

हेही वाचा… विधानसभा अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्कटदाबी – नाना पटोले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले, अडीच वर्ष ठाकरे-पवार सरकारमधील मुख्यमंत्री कोकणात फक्त् फेसबूक लाईव्ह करत राहीले. सरकार सौहार्दाचे असेल तर प्रतिमा खाली जात नाही. अडीच वर्षातील सरकार सौहार्दाचे नव्हते आणि म्हणूनच या सरकारची प्रतिमा खाली गेली. जे सरकार प्रवास करेल, संवाद साधेल, त्यांना जनतेची व समाजाची नाळ कळते. फडणवीस-शिंदे सरकार हा समाजाची नाळ कळली आहे. दररोज ते १८-१८ तास काम करतात आणि अडीच वर्षातील मुख्यमंत्री १८ महिन मुख्यालयात देखील येत नाहीत, असा टोला बावनकुळे यांनी विरोधकांना हाणला.