महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत राहतात. अलीकडेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा सर्वत्र निषेध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना राज्यपालांवर टीका केली.

हेही वाचा- अन गडकरी, फडणवीसांच्या खुर्चीवर ‘ते’ स्वतःच झाले विराजमान! निमंत्रण देऊनही कार्यक्रमाला न आल्याने भटके विमुक्त बांधव संतप्त

काय म्हणाले भुजबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अपमान करावसा वाटत नाही. पण ते महाराष्ट्रातील दैवतांचा सातत्याने अपमान करीत आहेत. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, मराठी माणूस यांच्याबाबत अवमान जनक वक्तव्य केले. आता तर त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांची मने दुखावली आहे. यासाठी ते स्वतः जबाबदार आहे, यापूर्वी असे कधी घडले नाही, असे भुजबळ म्हणाले.