नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. देशमुखांनी त्यांना झालेला तरुंगावासाचे खापर फडणवीस यांच्यावर एका पुस्तकाच्या माध्यमातून फोडले होते. त्यावरून देशमुख आणि फडणवीस यांच्या आरोपप्रत्यारोप देखील झाले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.

काँग्रेसचे गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यानिमित्त छत्रपती शाहून महाराज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या पूर्वनियोजित भेटीसंदर्भात देशमुखांकडून एक दिवसआधीच माध्यमांना माहिती देण्यात आली होती. परंतु यात कोणतीही राजकीय चर्चा नसून केवळ सदिच्छा भेट असल्याचे देशमुखांकडून सांगण्यात आले.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाले होतेस असा आरोप आता अनिल देशमुख यांनी केला होता.

चांदीवाल चौकशी समितीचा अहवाल हा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा हा खरा आहे असं अनिल देशमुख म्हणाले. अनिल देशमुख पुढे म्हणाले, चांदीवाल समितीचाअहवाल आल्यानंतर काही दिवसातच आमचं सरकार कोसळलं. त्याला जबाबदार देखील त्यांचाच पक्ष होता. त्यामुळे चांदीवाल चौकशी समितीचा अहवाल आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही. त्यानंतर मागची दोन वर्ष हाच चांदीवाल आयोगाचा अहवाल त्यांच्या सरकारकडे पडून होता. ११ महिने चौकशी आणि चौदाशे पानांचा रिपोर्ट महायुती सरकारनं जाहीर करावा, अशी माझी मागणी होती. त्यासाठी अनेकदा मी त्या आशयाचे पत्र देखील पाठवले असे अनिल देशमुख म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर काय?

“अलिकडच्या काळात मी सगळ्यांचा लाडका झालो आहे. एक पोलीस आयुक्त ज्यांचं राज्य आहे त्या गृहमंत्र्याच्या विरोधात विरोधी पक्षनेत्याच्या सांगण्यावरुन आरोप करुन नोकरी घालवण्यासाठी पुढे येईल का? अनिल देशमुख लपवाछपवी करतात. त्यांच्यावर असलेली केस भाजपाने टाकली नाही, केंद्र सरकारने टाकली नाही. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. माननीय चीफ जस्टिसच्या बेंचने हायकोर्टाने केस टाकली आणि त्यामुळे ते तुरुंगात गेले.” असे देवेंद्र फडणवीस असे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 अनिल देशमुख आता भाजपावर आणि माझ्यावर आरोप करत आहेत कारण त्यांना लोकांकडून साहनूभुती मिळवायची आहे. बघा माझ्यावर कसा अन्याय झाला हे लोकांना दाखवून द्यायचं आहे पण यांना जशास तसं उत्तर आपण दिलं पाहिजे. यांच्या आरोपांवर बोलणं मी माझ्यासाठी कमीपणा समजतो. साळसूद आणि साव बनून जे फिरत आहेत, असे देवेंद्र फडणवीस उत्तर दिले होते.