नागपूर: करोना काळात डॉक्टरांनी देवदुताप्रमाणे काम केलं. मी डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. नागपूर येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

लोकांना मदत करतांना कधी कधी डॉक्टरांना पैसे कमी करायला सांगावे लागले. कधी कधी आम्ही आमच्या खिशात हात घातले. रुग्णालयातील अडचणी आम्ही कोरोना काळात दूर केल्या. जे डॉक्टर टेंशनमध्ये होते तेही मला भेटलेय.

हेही वाचा…भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थिती चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, जीवदान देणारं परमेश्वराचं रुप म्हणून डॅाक्टरांचे स्थान आहे. आपण ते अनुभवत असतो. मी येताना ज्युपिटर रुग्णालयात फोन केला. डॉक्टरांना फी कमी करायला सांगितली. रुग्णाचे काही पैसे आम्ही देतो. मलाही दोन वेळा कोविड झाला. त्यावेळेस मला सात रेमडीसेवीर देऊन टाकल्या.

हेही वाचा…अकोल्यात प्रहारचा महायुतीला धक्का; काँग्रेसला पाठिंब्याचा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा ठराव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टर हा समाजाचा आधारस्तंभ आहे. जीवनदान देणारे परमेश्वराचे रुप म्हणजे डॉक्टर आहेत. कोणताही डॉक्टर पेशंट आपल्या घरी सुखरुप जावा, यासाठी प्रयत्न करत असतो. पैसे कमी करायला सांगितले तर डॉक्टर आवडीने करतो. कारण त्यांना माहिती आहे, हे खिशातून पैसे देतील. कोविडमध्ये अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला.