प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : शिकविण्याची हातोटी असली की दुर्बोध विषय पण विद्यार्थ्यांच्या गळी उतरवणे शिक्षकांना सोपे जाते. रंजक, गेय माध्यमातून शिकविणारे शिक्षक म्हणूनच विद्यार्थीप्रिय होतात. त्यात जर मुल्यप्रधान विषय असे कथा स्वरूपात आले तर सगळे सुगम. ही बाब हेरून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मुलांना प्रिय अश्या कॉमिक बूकच्या माध्यमातून धडे देण्याचे पाऊल उचलले आहे.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत शालेय आरोग्य व निरोगीपणा या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एक शैक्षणिक साधन म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. पुस्तकातील पात्र मनोरंजक पद्धतीने कथा सांगतात.

आणखी वाचा-रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ तारखेपासून २०० रेल्वेगाड्या रद्द होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य, नागरी मूल्ये, लैंगिक समानता, पोषण, स्वच्छता, मादक द्रव्ये व त्याचा प्रतिबंध, मानसिक आरोग्य असे विषय कथेच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. आकर्षक पात्र व आकर्षक कथन हे सूत्र आहे. मुलांच्या वाचनात कॉमिक पुस्तके अग्रभागी असतात. ते डोळ्यापुढे ठेवून ही शालेय पुस्तके तयार करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने युनेस्कोच्या सहकार्याने तयार केलेल्या या पुस्तकांचे प्रकाशन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले आहे.