नागपूर : ‘गडकरी साहेब… आमचे रस्ते चोरीला जाऊ लागले आहेत…’ दाभा ले आऊट येथील नागरिकांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेच तक्रार केली. त्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसह सारेच हादरले आहेत.

दाभा येथील पंजाबराव देशमुख गृहनिर्माण सोसायटीच्या सर्व नागरिकांनी तसेच कृषीनगरच्या रहिवाशांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत निवेदन दिले. त्यावर संपूर्ण चौकशी करून तत्काळ मागण्या निकाली काढणार असे आश्वासन गडकरी यांनी या रहिवाशांना दिले. सोसायटीच्या संपूर्ण नागरिकांनी नागपूर सुधार प्रन्यासकडे संपूर्ण पैसे भरूनसुद्धा तेथील रस्ते, उद्यान, सांडपाण्याची व्यवस्था, समाज भवन आदी कामांकडे स्थानिक प्रशासन गेल्या २० वर्षांपासून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच नागरिकांनी गडकरी यांना निवेदन दिले.

हेही वाचा – वर्धा : वंचितांना रवा साखरेचा लाभ, हजारोंची झुंबड

हेही वाचा – राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट कायम, ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोसायटीच्या रहिवाशांची भूमिका स्पष्ट करताना चित्रकार प्रशांत अनासने यांनी गडकरींशी सविस्तर चर्चा केली. पंजाबराव देशमुख गृहनिर्माण सोसायटीच्या समस्त नागरिकांनी नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिका येथे अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, याकडे कुणीही लक्ष दिले नाही. म्हणून निवेदनात या परिसरातील सर्विस रोड व अंतर्गत काही रस्ते चोरीला जात आहे, अशी भूमिका मांडली. यावेळी सोसायटीचे तुषार जिचकार, प्रशांत अनासने, दादाराव बोरकर, दुर्गाप्रसाद पटले, संतोष पाठक, अनिल पारखी, योगेश अनासाने, रितेश देशमुख, राजेश वानखेडे, जागेश बडवाईक, विकास मुंदाफळे, आणि विजय पावडे उपस्थित होते.