नागपूर : महाराष्ट्रातून मान्सूनने काढता पाय घेतला. परतीच्या पावसाच्या सरीदेखील राज्याची वेस ओलांडत आहे. मात्र उन्हाचा दाह चांगलाच वाढला आहे. एकीकडे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली असताना महाराष्ट्रात उन्हाचे चटके बसत आहेत.

हेही वाचा – नागपूर : आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आजपासून असहकार आंदोलन

हेही वाचा – वर्धा : हद्दच झाली! नळाच्या पाण्यातून कधी मृत पिल्लू, तर कधी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परतीच्या पावसाचा प्रवास आता अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचला असतानाच महाराष्ट्रात उन्हाचा दाह आणखी वाढला. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील २४ तासांनंतर राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ आणखी वाढणार आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस हा दाह कमी होताना दिसेल. बुधवारपासून कोकण, मुंबई, नवी मुंबई, पालघर, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये उकड्यात प्रचंड वाढ होताना दिसेल. तर सातारा, कोल्हापुरात पहाटेच्या वेळी तापमानात काहीशी घट नोंदवली जाणार आहे. एकिकडे दिल्लीमध्ये पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा पसरलेला असतानाच दुसरीकडे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्येही तापमानात घट नोंदवली गेली आहे.