नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत चालली आहे. गोडसे हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी आहे हे जगजाहीर असताना त्याचे गुणगान गाण्याची हिंमत फक्त भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाच होते. सदावर्ते नावाच्या एका विकृत इसमाने स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर गोडसेचा फोटो छापून उदात्तीकरण केले आहे. या विकृत इसमाला तात्काळ बेड्या ठोकण्याचे धाडस गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवावे, असे आव्हान प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले.

हेही वाचा : यवतमाळच्या झरीजामणीत विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदावर्ते हा व्यवसायाने वकील असलेला इसम सातत्याने भडाकाऊ विधाने करत असतो, सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम करतो. महात्मा गांधी यांच्याबद्दलही हा इसम गरळ ओकत असतो. आज याने गोडसेचा फोटो स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर छापून महात्मा गांधी यांचा अपमान केला. “गांधी यांचा विचार आता शिल्लक राहिलेला नाही” असे म्हणत सदावर्ते याने नथुरामचे गुणगान गायले. सदावर्ते या इसमाच्या मागे कोणाची शक्ती आहे, त्याचा बोलविता धनी कोण आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. राष्ट्रपित्याचा अपमान काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असेही लोंढे म्हणाले.