नागपूर : सरसंघचालकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर उभे राहून स्वंयसेवकांचे पथसंचनाचे अवलोकन करणे ठीक आहे पण त्यांनी गांधीचे विचार स्वीकारावे नाही तर पुढे गांधी आणि मागे नथुराम असे असायला नको, त्यांना नथुराम गोडसे, चालतो, त्यांनी बुरसेटलेला विचार सोडावा.. मनुस्मृती दहन करावे, आम्ही त्यांचं स्वागत करू, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नागपूर येथे पत्रकार परिषदेत म्हणाले.

काँग्रेसच्या मशाल यात्रेनिमित्त सपकाळ रविवारी नागपूरमध्ये आले होते. आमदार अभिजत वंजारी यांच्या पदवीधर मतदारसंघ नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर गिरीश पांडव यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. शनिवारी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या पथसंचलनाचे अवलोकन सरसंघचालक डॉ. मोहन भागव यांनी बर्डीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजळ उभे राहून केले. यासंदर्भात सपकाळ यांना विचारले असता ते म्हणाल,े सरसंघचालकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर उभे राहून स्वंयसेवकांचे पथसंचनाचे अवलोकन करणे ठीक आहे पण त्यांनी गांधीचे विचार स्वीकारावे नाही तर पुढे गांधी आणि मागे नथुराम असे असायला नको, त्यांना नथुराम गोडसे, चालतो, त्यांनी बुरसेटलेला विचार सोडावा.. मनुस्मृती दहन करावे, आम्ही त्यांचं स्वागत करू.

मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली वारी ही शेतकऱ्यासाठी केंद्राकडून मदत आणण्यासाठी नव्हती तर ते सूरजागडच्या (गडचिरोली) प्रकल्पासाठी ना हरकत प्रमामपत्र घेण्यासाठी गेले होते. तेथून ते हात हलवत परत आले, असे सपकाळ म्हणाले. शेतकरी अडचणीत आहे त्यांना मदत करणे आवश्यक आहे मात्र हे सरकार मदत करताना दिसत नाही शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत करावी. अन्यथा आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करू ,असा इशारा त्यांनी दिला. सोमवारी नागपूरच्या दीक्षाभूमी पासून सेवाग्राम पर्यंत पदयात्रा काढणारअसून तुषार गांधी नेतृत्व करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलावे. तिथे का बोलत नाही.. जातीत भांडण लावण्याच काम भाजपा करत आहे, असा आरोप त्यांनी केला.