नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरून लक्ष्य करीत असल्याचे दिसून येते. नागपुरात मंगळवारी प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारणीची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्याची संधी त्यांनी सोडली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी एक वक्तव्य ऐकत होतो. ते ब्राझीलच्या निवडणुकीवर बोलत होते. ब्राझीलमध्ये निवडणुकीत पराभव झालेल्यांनी तेथील राष्ट्रपती भवन आणि संसद भवनावर हल्ला केला. अशा प्रकारचा हल्ला लोकशाहीसाठी बरोबर नाही असे पंतप्रधान सांगत होते. पण, त्यांनी ब्राझीलच्या परिस्थितीवर बोलण्यापेक्षा भारतात सध्यास्थिती आहे. त्यावर आपली भूमिका मांडली पाहिजे.

हेही वाचा >>> “पक्षहिताला कुणी बाधा पोहचवत असेल तर सावधान…”, काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या बदलांचे नाना पटोलेंचे संकेत

आज भारतामध्ये लोकशाहीचे वातारण राहिले नाही. मोदी सरकार आणि न्यायलालिका यांच्यात भांडणे सुरू आहेत. या काळात निवडणूक आयोग आणि प्रशासकीय व्यवस्था सुरक्षित नाही. सरकारने प्रत्येक संविधानिक संस्था खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा अवस्थेत लोकशाही टिकून राहणे कठिण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी लोकशाही वाचली पाहिजे म्हणून भारत जोडो यात्रा काढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या लोकशाहीवर बोलण्याआधी भारताच्या आजच्या परिस्थतीवर भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president nana patole criticism of prime minister narendra modi rbt 47 ysh
First published on: 11-01-2023 at 15:01 IST