वर्धा : थेट मतदारांपर्यंत पोहोचल्याशिवय आता गत्यंतर नाही, हे काँग्रेस नेत्यांना पुरते उमगले आहे. म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता मतदार संपर्क अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत ग्रामस्तरीय काँग्रेस समिती स्थापन करणे, शहरात प्रभाग स्तरीय समिती, तर सर्व जिल्ह्यांत बूथ समित्या स्थापन करायचा आहेत. मतदार संपर्क अभियानाचा अविभाज्य भाग म्हणून हे तीनही कार्यक्रम ठराविक कालमर्यादेत सचोटीने व निष्ठेने राबविण्याची तंबी पटोले यांनी दिली आहे.

हेही वाचा – गोंदिया: देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी संघटीत समाज महत्त्वाचा : अतुल मोघे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व कामाचा आढावा घेण्यासाठी राज्य समन्वयक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष भा. इ. नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी प्रपत्र तयार करण्यात आले आहे. त्यात कार्यक्रम अमलाची माहिती जिल्हाध्यक्ष यांनी भरून पाठवायची आहे. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सदर सर्व समित्या स्थापन करणे बंधनकारक असून त्याचा अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत प्रदेश कार्यालयास सादर करायचा आहे. आगामी लोकसभा, विधानसभा व अन्य निवडणुका लक्षात घेवून समित्या नेमण्याची कालमर्यादा पाळणे अपेक्षित आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नमूद करीत त्यामुळे काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, अशी आशा ते व्यक्त करतात.