नागपूर: ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील १५ हजार १७ ग्राहकांनी छापील वीजदेयकांना नकार देत महावितरणच्या गो- ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. या ग्राहकांना प्रत्यक्ष देयकाएवजी ई- मेल व एसएमएसवर देयक जात असल्याने महिन्याला १० रुपये असे वर्षाला १२० रुपये देयकात वाचत आहे.

महावितरणची नागपूर जिल्ह्यातील ग्राहक संख्या बघता या योजनेमुळे ग्राहकांचे वीज देयकात वर्षाला १८ लाख २ हजार ४० रुपये वाचलेआहे. महावितरणकडून पर्यावरणपूरक गो ग्रीन योजना सुरू केली गेली. यामध्ये वीज देयकाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसवर देयकाचा पर्याय दिला गेला. या पर्यावरणपूरक सेवेसाठी प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रती मासिक देयक दहा रुपये अशी वर्षाला १२० रुपये सवलत मिळले.

हेही वाचा… बुलढाणा : रविकांत तुपकरांनी भाजपामध्ये यावे, ‘या’ नेत्याने दिली ‘ऑफर’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावितरणकडून देयक तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा वीज देयक ग्राहकांना पाठवले जाते. हे देयक मुदतीपूर्वी भरल्यास ग्राहकांना तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलतही मिळते. याशिवाय हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम यासारख्या युपीआय किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत देखील मिळते, अशी माहिती महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांनी दिली.