भंडारा : शाळा सुटल्यानंतर वऱ्हांड्यात पायावर पाय ठेऊन बसल्याचे पाहून भडकलेल्या एका शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. निर्दयीपणाचा कळस गाठणारी ही घटना तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये घडली. या प्रकरणी मंगळवारी गोबरवाही पोलीस ठाण्यात शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोमल मेश्राम, असे या शिक्षकाचे नाव आहे.

सोमवारी शाळा सुटल्यानंतर चिखला येथे जाणा-या बसबाबत सूचना न मिळाल्याने मयंक प्यारेलाल धारगावे ( १५, रा. चिखला) त्याच्या मित्रांसोबत वऱ्हाड्यात बसून होता. तेथे पायावर पाय ठेऊन विद्यार्थी बसले होते. दरम्यान, शिक्षक मेश्राम तेथे आले. पाय सरळ ठेऊन बसा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना बजावले. अशातच, शिक्षकाने तुला समजत नाही का, असे म्हणत मयंकला मारायला सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मयंक जोरजोराने ओरडत होता.

हेही वाचा: नागपूरच्या शाळकरी मुलांसाेबत विष्णू मनोहर तयार करणार ५ हजार किलोंची भाजी; करणार सलग १५ वा विश्वविक्रम

काही वेळातच तो बेशुद्ध होऊन पडला. त्यानंतर ह प्रकार त्याच्या मित्रांनी चिखला येथे जाऊन मयंकच्या वडिलांना सांगितला. थोड्याच वेळात शाळा व्यवस्थापननेही मुलाला तुम्ही शाळेत येऊन घेऊन जा, असे सांगितले.यावरून वडील प्यारेलाल आणि आई शाळेत पोहोचले. मयंक शाळेच्या वऱ्हांड्यात पडून होता. बाजूला शिक्षक उभे होते. वडिलाने मयंकला गोबरवाही आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर गोबरवाही ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शिक्षक कोमल मेश्रामविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: नागपुर: बंटी बबलीने सुफी फंड आणला आणि…..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ काढल्याचा राग

शिक्षक मेश्राम मयंकला मारहाण करीत असताना, ‘व्हीडिओ काढण्याची मोठी आवड आहे ना, आता काढ फोटो ‘, असे म्हणत होता. दुर्गोत्सवाच्या काळात ऑर्केस्ट्रा बघताना मयंकने चित्रफीत काढली होती. त्याचाच राग शिक्षकाच्या मनात होता आणि त्यातूनच त्याला मारहाण केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.