नागपूर: नोकरीचा शोध घेत असताना एका परिचारिकेला सायबर गुन्हेगारांना जाळ्यात अडकविले. टास्क पूर्ण केल्यास २५ लाख रुपये देण्याच्या आमिषाला ती बळी पडली. २५ लाख मिळविण्यासाठी परिचारिकेने स्वत:कडील ३ लाख रुपये गमाविले. या प्रकरणी तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

आसावरी दिलीप डोनाडकर (२४, किर्तीनगर, नरसाळा रोड) ही परिचारिका असून पुण्यात नोकरी करते. ती सुटीत नागपुरात आली होती. तिला अर्धवेळ नोकरी शोधायची होती. त्यामुळे तिने गुगलवर काही संकेतस्थळांचा शोध घेतला. त्यात एका संकेतस्थळावरील मोबाईल क्रमांकावरून आसावरीला फोन आला. त्याने अर्धवेळ नोकरीसाठी २० ते ३० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी टास्क पूर्ण केल्यास अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी असल्याचे सांगितले.

हेही वाचा… एमपीएससीतर्फे विविध पदांची नवीन भरती, त्वरित अर्ज करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आसावरीने त्याला होकार दिला. तिला एका टेलीग्राम ग्रूपमध्ये सामिल करून घेतले. तिला काही सदस्यांनी लाखांमध्ये पैसे कमविल्याचे सांगितले. काहींनी २५ लाख रुपये कमविल्याचे ‘स्क्रिनशॉट’ टाकले. त्यामुळे आसावरीचा विश्वास बसला. तिने सुरुवातीला २० हजार रुपये गुंतवले. त्यावर तिला १० हजार रुपये लाभ मिळाला. त्यानंतर ती रक्कम गुंतवत गेली आणि तिला लाभ मिळत गेला. तिने ३ लाख रुपये गुंतवले आणि सायबर गुन्हेगाराने पैसे आपल्या खात्यात वळते करून आसावरीची फसवणूक केली.