नागपूर : मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या चक्रीवादळाला ‘तेज’ असे नाव देण्यात आले आहे. पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ आक्राळ-विक्राळ रुप धारण करण्याची शक्यता असून काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

‘तेज’ चक्रीवादळ रविवारी दुपारनंतर अतिशय तीव्र होईल. हे चक्रीवादळ अधिक सक्रिय झाल्यानंतर दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रावर १२५-१३५ किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग १५० किमीपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे आज केरळ, तामिळनाडूमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि पुद्दुचेरीमध्येही पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे भारतीय तटरक्षक दलाने आंध्र आणि तमिळनाडू किनारपट्टीवर काम करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत. त्यांना तातडीने माघारी फिरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – अकोला : अत्यावश्यक सेवांसह कौशल्यपूर्ण उमेदवारांना स्वयंरोजगार मिळणार, राज्यातील अभिनव प्रयोग

हेही वाचा – नागपूर : सरकारविरोधात राष्ट्रीय आदिम कृती समितीकडून निदर्शने, हलबा समाजावर अन्यायचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत मच्छिमारांनी दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहनदेखील केले आहे. दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाने चेन्नई, आंध्र आणि तमिळनाडू किनारपट्टी भगात अनेक जहाजे तैनात केली आहेत. तेज चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला सध्या कोणताही धोका नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.