scorecardresearch

वाशीम : वादळी पावसामुळे संत्रा पिकांचे नुकसान

मालेगाव तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे

damage of orange farm
वाशीम : वादळी पावसामुळे संत्रा पिकांचे नुकसान (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

वाशीम: जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, वाशीम, मानोऱ्यासह कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांसह मालेगाव तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा- अवकाळीचा रब्बी पिकांना तडाखा; संत्र्यासह गहू, हरभऱ्याची हानी

वाशीम जिल्ह्यात ६ मार्च रोजी सायंकाळी व रात्री अनेक भागात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गहू पिकाची नासाडी झाली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आला आहे. तर दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे अवकाळी पावसाने संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 18:23 IST
ताज्या बातम्या