नागपूर : आईच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पारडीत उघडकीस आली. दुर्गाप्रसाद गोकुलप्रसाद पालीवाल (२५,रा.गंगाबाग, पारडी) असे मृत युवकाचे नाव आहे. दुर्गाप्रसादच्या वडिलाचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले तर एका वर्षांपूर्वी आईचेही निधन झाले. तेव्हापासून दुर्गाप्रसाद नैराश्यात गेला. तो मोठ्या भावाकडे राहत होता. मात्र, तो आईची आठवण करीत वारंवार रडत होता.

हेही वाचा – ‘डीपफेक’ व्हिडीओवर राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, “तंत्रज्ञानाचा वापर…”

हेही वाचा – नागपूर : लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात नवविवाहितेने संपवले जीवन….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मला आईची आठवणे येते. मला आईच्या भेटीला जायचे आहे. मी आईशिवाय जगू शकत नाही.’ असे म्हणत होता. शुक्रवारी सायंकाळी घरी एकटा असताना त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.