लोकसत्ता टीम

नागपूर : संजय राऊत हे त्यांच्या पक्षात कोण मदारी आणि कोण बंदर आहे याबाबत बोलले असतील. मात्र त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी इतके ते काही मोठे नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असते ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस मदारी आणि दोन उपमुख्यमंत्री बंदर असल्याची टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी संजय राऊत हे आपल्या पक्षातील मदारी आणि बंदराबाबत बोलले असतील. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी असे इतके मोठे नाही.

आणखी वाचा-“मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; म्हणाले, “संजय राऊत त्या लायकीचे नाहीत”

काही जिल्ह्यात नक्षलवाद रोखण्यात यश आले आहे. पाच सहा वर्षामध्ये भारतात आणि महाराष्ट्रात नक्षलवादाचा सामना केला असून त्यांचे अनेक तळ उद्धवस्त केले आहे. या संदर्भात पुढच्या दोन वर्षाचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. विरोधी पक्षांनी टीका टीपणी करण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे पद आणि पक्ष सांभाळावा अशी उपरोधीक टीका फडणवीस यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एशियन खेळामध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन. ओजस देवतळे यांनी तिसरे पदक मिळवले असून त्यांनी नागपूर आणि भारताचे नाव मोठे केले आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.