संभाजीनगर घटनेवरून विरोधी पक्षातील काही नेते स्वार्थासाठी विधान करत असून त्याला राजकीय रंग देत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव कोणते. हे नेते स्वार्थासाठी राजकीय वक्तव्य करत आहेत. असे वक्तव्य छोट्या बुद्धीने आणि राजकीय सूडबद्धीने केलेले असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हेही वाचा >>> VIDEO:धावती रेल्वेगाडी पकडण्याच्या नादात महिला पडली, मग मुलीनेही धावत्या गाडीतून उडी मारली; दैव बलवत्तर म्हणून…
फडणवीस नागपुरात प्रसारमाध्यमाशी बोलत होते. संजय राऊत किंवा अजित पवार यांनी केलेली विधाने मी ऐकली नाहीत, पण संभाजीनगरच्या घटनेवरुन शांतता प्रस्थापित करण्याची वेळ असताना विरोधी पक्षातील नेते स्वत:च्या स्वार्थासाठी वक्तव्य करत असून हे राज्यासाठी दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली. तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिथे काही नेते भडकवणारे वक्तव्य करत परिस्थिती बिघडवण्याचे प्रयत्न करत आहेत. नेत्यांनी अशावेळेस कसे वागले पाहिजे याची काळजी घ्यावी. शहर शांत ठेवणे ही प्रत्येक नेत्याची जबाबदारी आहे. या क्षणी शांतता आहे. ही शांतता राहावी यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागेल, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >>> अकोला: महादेव-पार्वतींच्या लग्न सोहळ्याचा उत्साह; आदिवासी कोळी महादेव समाजाची शेकडो वर्षांची परंपरा
सर्वोच्च न्यायालयाने सध्या कोणतेही निरीक्षण नोंदवले नाही. महाराष्ट्र सरकार विरोधात न्यायालयाची अवमान केल्याची प्रक्रिया सुरू केली नाही. एक सामान्य विधान केले आहे. सर्व राज्य सरकारांनी काय केले पाहिजे, असे न्यायालय बोलले आहे. मात्र काही नेते याबद्दल बोलत आहेत. त्यांना न्यायालयीन कारवाई फारशी समजत नाही अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, गुरुवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी रामनवमीनिमित्त रामनगरातील राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.