वर्धा : विविध पक्षीय उमेदवारांची नामांकन पत्रे दाखल करण्याची धावपळ अखेरच्या टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडीने मंगळवारी शरद पवारांच्या उपस्थितीत अमर काळे यांचा अर्ज सादर केला. जोरदार सभा, भव्य रॅली व मग अर्ज सादर करण्याचा सोपस्कार पार पडला. मात्र भाजपचे त्याच्या नेमके आज घडत आहे. प्रथम अर्ज, मग सभा व नंतर रॅली असे आयोजन आहे. कारण भाजपचे स्टार प्रचारक असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम.

ते आज सकाळी अकरा वाजता सेवाग्राम हेलिपॅड वर उतरतील. सोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहणार. तेथून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होतील. या ठिकाणी रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या उपस्थितीत सादर केल्या जाणार आहे. अर्ज सादर झाल्यानंतर फडणवीस हे सभा स्थळी स्वाध्याय मंदिर सभागृहात पोहचतील. नंतर निघणाऱ्या रॅलीत पण ते सहभागी होणार असल्याची माहिती भाजपच्या माध्यम विभागाचे प्रणव जोशी यांनी दिली.

हेही वाचा…सुधीर मुनगंटीवार म्हणतात,’ जोरगेवारांनी आता मदत केली नाही तर मी त्यांना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा कार्यक्रम झाल्यानंतर फडणवीस व बावनकुळे यांना घेऊन निघणारे हेलिकॉप्टर थेट अकोला येथे लॅन्ड होणार. तिथे भाजप उमेदवाराचा अर्ज सादर करण्यास हे दोघे हजर राहणार आहे. अकोला येथून अन्य ठिकाणी असणाऱ्या कार्यक्रमास ते रवाना होणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले की प्रथम अर्ज व नंतर रॅली असा उलट सुलट कार्यक्रम म्हणता येणार नाही. वर्धेतील प्रत्येक निवडणूक उपक्रमात सहभागी होत असतानाच अन्य ठिकाणी पण जाता आले पाहिजे, हे लक्षात घेऊन नियोजन झाले असावे.