नागपूर : महाविकास आघाडीमध्ये सगळे इंजिन एका रांगेत उभे आहेत. सर्व हात वर करून आम्ही एकत्र आहोत असे सांगायचे आणि पुन्हा आपापले इंजिन घेऊन वेगळ्या दिशेने निघून जायचे. असे इंजिन काय कामाचे आहे? आता या तुटलेल्या इंजिनवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी बोलत होते.

कोणीतरी महाविकास आघाडीचे वर्णन अतिशय चांगले केले. महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, ही आघाडी केवळ इंजिन आहे. यांना एकही डबा नाही. त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची ही जागा नाही. प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेने चालले आहे त्यामुळे हे जनतेच्या कामाचे नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा…दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी आमची युती श्रीकांत शिंदे यांना निवडून आणेल, असेही फडणवीस म्हणाले.

बूथ चलो अभियान हे वारंवार आम्ही राबवत असतो. स्थापना दिवसाचे औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललो आहोत.भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे जो ‘बूथ’ ला प्रमुख धरून काम करत असतो.त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे सोपे होते.

हेही वाचा…विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?

महायुतीत तीन पक्ष सोबत आहे त्यामुळे मित्र पक्षांचा सन्मान राखणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे लोकसभेच्या ३३ जागा आम्ही लढणार असा आम्ही कधीही दावा केला नव्हता. आमचा प्रयत्न होता की तिघांचाही सन्मान राखून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे आणि तशा जागा आम्हाला मिळाल्या आहेत जयंत पाटील हे पक्षातील नेतृत्वावर नाराज आहेत .त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे असेही फडणवीस म्हणाले.