गोंदिया : राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा गौप्यस्फोट केला. जयंत पाटील हे आमच्याबरोबर येण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत. अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांच्यासोबत आजघडीला एकूण ४५ आमदार आहेत. येत्या काळात ५३ आमदार होतील हे नक्की, असाही दावा आत्राम यांनी आज गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाणे नवीन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी केला.

हेही वाचा – राष्ट्रपती एक डिसेंबरला नागपूरला येणार, पाच महिन्यांत दुसरा दौरा

हेही वाचा – अन्न पदार्थात भेसळ, विशेष मोहिमेत ‘या’ बाबींची तपासणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून मराठा बांधव आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आत्राम यांना मराठा आरक्षणासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, मराठा समाजबांधवांनी धीर धरावा, आक्रमक होऊ नये. आमचे सरकार मराठ्यांच्या पाठीशी असून मराठ्यांसाठी क्रांतिकारक निर्णय घेणार आहोत.