नागपूर : महाराष्ट्रातील उत्तर-पश्चिमी घाटामधून निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधील संशोधकांना यश आलेले आहे. सोबत निमास्पिस गिरी गटातील इतर नऊ प्रजातींचे नव्याने वर्णन करुन जुन्या संशोधन निबंधांमधील विसंगती दूर करण्यात आल्या आहेत. सदरचे संशोधन हे अक्षय खांडेकर यांच्या शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागामधून सुरु असलेल्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे आणि प्रा. डॉ. सुनिल गायकवाड त्याचे मार्गदर्शक आहेत. त्यासोबत या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, सत्पाल गंगलमाले आणि डाॅ. ईशान अगरवाल यांचा सहभाग आहे.

नव्याने शोध लागलेल्या पालींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळांवरुन त्यांचा समावेश निमास्पिस या कुळात केलेला आहे. यापैकी ‘निमास्पिस बर्कीएन्सिस’ या प्रजातीचा शोध कोल्हापूरमधील बर्की (शाहूवाडी), वाशी (पन्हाळा) आणि तळये बुद्रुक (गगनबावडा)  या ठिकाणांवरुन लागला आहे. बर्की राखीव वनक्षेत्रामधील आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण ‘निमास्पिस बर्कीएन्सिस’ असे करण्यात आले आहे. ‘निमास्पिस चांदोलीएन्सिस’ ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील चांदेल रेंजमधे आढळून आली. चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण ‘निमास्पिस चांदोलीएन्सिस’ असे करण्यात आले आहे. निमास्पिस महाराष्ट्राएन्सिस ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील रुंदीव रेंजमधे आढळून आली. महाराष्ट्रामधील आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण ‘निमास्पिस महाराष्ट्राएन्सिस’ असे केले आहे. तसेच निमास्पिस सह्याद्रीएन्सिस ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या वेत्ती रेंजमधे आढळून आली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधे स्थित आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण केले आहे.

Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला

हेही वाचा >>>अमरावती : कारचा टायर फुटून भीषण अपघात; तीन ठार, पाच जण जखमी

निमास्पिस कुळातील पाली त्यांच्या प्रदेशनिष्ठतेसाठी ओळखल्या जातात. त्यांचे आढळक्षेत्र छोट्या भूप्रदेशावरती विस्तारलेले असते. थंडाव्याच्या जागांशिवाय त्या तग धरु शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे आढळक्षेत्र मर्यादित अनुकूल जागांपुरतेच सीमीत असते. सदरच्या संशोधन मोहीमांमधे नव्याने शोधलेल्या पाली त्यांचे आढळक्षेत्र सोडून इतरत्र कुठेही आढळल्या नाहीत. शिवाय चांदोली राष्ट्रीय उद्यानामधून शोधलेल्या तीन प्रजाती एकमेकांपासून फक्त ८ ते १२ किलोमीटर अंतरावरुन शोधलेल्या आहेत. गर्द झाडीच्या जंगलांच्या मधे पसरलेल्या उघड्या माळसदृश्य सड्यांनी या प्रजातींचा वावर सीमीत केला असावा अस संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे. अशी टोकाची प्रदेशनिष्ठता असणे हे निमास्पिस कुळातील पालींचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच या पालींचे आढळक्षेत्र असणारी जंगले संवर्धनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरत आहेत. या संशोधनामधे महाराष्ट्र वन विभागाने आवश्यक ते परवाने देऊन सहकार्य केले. तसेच, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील (चांदोली राष्ट्रीय उद्यान) वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांची सव्हेक्षणादरम्यान मोलाची मदत झाली.

हेही वाचा >>>गडचिरोली : २८ लाखांचा मद्यसाठा जप्त; निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

“मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलच्या रांगांची संख्या, शेपटीच्या खालच्या बाजूला असणार्‍या खवल्यांच्या रचना आणि विशिष्ट जनुकीय संचांवरुन या पाली एकमेकांपासून आणि कूळातील इतरांपासून वेगळ्या प्रजातीच्या आहेत हे स्पष्ट करण्यात यश आलेले आहे. या चारही पाली दिनचर आहेत. झाडांचे बुंधे आणि दगडांच्या आडोश्याने त्या वावरतात. छोटे किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे या पाली अन्नसाखळीत समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.” – प्रा. डॉ. सुनिल गायकवाड.

“यापूर्वी झालेल्या संशोधनांमधून निमास्पिस गिरी गटात महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातून एकूण दहा प्रजाती नोंदवलेल्या होत्या. यापैकी बहुतांश प्रजातींच्या वर्गीकरणामधील विसंगती आणि चुकांमुळे निमास्पिस गिरी गटातील पालींवर नव्याने अभ्यास करणे आव्हानात्मक बनले होते. वेगवेगळ्या प्रजातींमधील बाह्य वैशिष्ट्ये नोंदवण्यासाठी यापूर्वींच्या संशोधकांनी निवडलेल्या अनेक पद्धतींमधे सुसुत्रता नसल्याचे नव्याने आढळून आले. जनुकीय संचामधील वेगळेपणाच्या पुष्ठीनंतर संशोधकांकडून बाह्य वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब ठरत आहे. या विसंगती दूर करण्यासाठी, सदरच्या संशोधनामधे जुने नमुने तपासण्यात आले; तसेच पूर्वीपासून ज्ञात असलेल्या प्रजातींच्या आढळक्षेत्रामधून नमुने नव्याने गोळा करुन त्यांच्यात स्थिर राहणारी बाह्य वैशिष्ट्ये नव्याने मांडण्यात आली.” – अक्षय खांडेकर