लोकसत्ता टीम

चंद्रपूर: माझ्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार काँग्रेसशी निष्ठावान आहेत. आम्ही काँग्रेस सोबत राहू. जिल्ह्यात लोकसभा तथा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला वातावरण अतिशय पोषक आहे. आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावान सैनिक आहोत, अफवांवर विश्वास ठेवू नका, आम्ही काँग्रेसमध्येच आहोत, असे मत राजुराचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यातून काहीतरी खोडसाळपणा होत आहे. मी स्वतः आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील काँग्रेसचे सर्व आमदार हे काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक आहोत. आमचे कुटुंब माझ्या वडिलांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी अगदी युवा अवस्थे पासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहे आणि सदैव काँग्रेस पक्षाचेच काम करीत राहणार आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाची विचारसरणी, गांधी परिवार, पुरोगामी विचारधारा यासह घट्ट बांधलेले आहोत. माझ्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील कोणीही काँग्रेस आमदार भाजप मध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही.

आणखी वाचा-अशोक चव्‍हाण हे भाजपाच्‍या ‘ब्‍लॅकमेलिंग’चे बळी, काँग्रेसच्‍या नेत्‍या यशोमती ठाकूर यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार आणि खोडसाळ असून चंद्रपूर जिल्हातील माझ्या व काही काँग्रेस आमदारांबाबतचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संपूर्ण चंद्रपूर जिल्हात काँग्रेसच्या बाजूने वातावरण असून चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेसह जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली.