लोकसत्ता टीम

नागपूर: दारुड्या जावयाने घरात झोपलेल्या सासूवर बलात्कार केला. नात्याला काळिमा फासणारी घटना सावनेर शहरात घडली. या प्रकरणी सासूच्या तक्रारीवरून पोलिसांनी जावयाला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी होमेश हा एका बारमध्ये वेटर म्हणून कामाला आहे. त्याला पत्नी व मुलगी आहे. मात्र, त्याला दारुचे व्यसन असल्यामुळे त्याचे पत्नीशी पटत नाही. तो सध्या सासुरवाडीत राहतो. तो विकृत मानसिकतेचा असल्यामुळे त्याच्या वर्तवणुकीबाबत अनेक महिला तक्रारी करीत होत्या. त्यावरूनही त्याचे आणि पत्नीचे वारंवार वाद होत होते.

आणखी वाचा- नागपूर: ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लीलता, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “सहन…”

शनिवारी रात्री बारा वाजता तो दारु पिऊन घरी आला. त्यावेळी पत्नी आणि सासू एका खोलीत झोपलेल्या होत्या. त्याने लगेच पत्नीला झोपेतून उठवले आणि बेडरुममध्ये येण्यास सांगितले. मात्र, तिने सोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला मारहाण केली. त्यामुळे ती भीतीपोटी बाजूच्या खोलीत गेली आणि आतमधून कडीकोंडा लावून झोपली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दरम्यान, होमेशने मध्यरात्रीनंतर अडीच वाजता झोपलेल्या सासूशी अश्लील चाळे केले व तिचे तोंड दाबून तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने ही बाब आपल्या मुलीला सांगितली. तिने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी सासूच्या तक्रारीवरून जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.