अमरावती : संपूर्ण आयुष्य कला, संगीत व साहित्य सेवेसाठी वाहून घेणाऱ्या जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांच्या मानधन योजनेचे प्रस्ताव निवड समितीअभावी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात धूळ खात पडले आहेत. त्यामुळे आता समित्या कधी स्थापन होणार अन् निवड कधी होणार याकडे कलावंतांचे लक्ष लागले आहे.

शासनाच्या विविध योजनांची माहिती कला पथक, कीर्तनाच्या माध्यमातून कलावंत करीत आहेत. या कलावंतांना शासनाकडून दरमहिन्याला मानधन दिले जाते. त्यासाठी समितीच्या माध्यमातून कलावंतांची निवड करून त्यांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत प्रस्ताव मागवले जातात. त्यानंतर मानधन निवड समितीच्या बैठकीत या कलावंतांची मानधनासाठी निवड केली जाते.

हेही वाचा – नागपूर : शेतकरी महिलेच्या परिश्रमातून फुलली नैसर्गिक शेती

कलेवर जीवन अवलंबून असलेल्या लोक-कलावंतांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असताना शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक वृद्ध कलावंतांच्या कुटुंबीयांवर बिकट स्थिती ओढवली आहे. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही वृद्ध कलावंतांच्‍या मानधन योजनेचे प्रस्ताव, पंचायत समिती व समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात मंजुरीसाठी निवड समितीअभावी धूळ खात पडले असून, तात्काळ समिती गठित करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हा वृद्ध कलावंत संघटनेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.

हेही वाचा – नागपूर : शेतकरी महिलेच्या परिश्रमातून फुलली नैसर्गिक शेती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृद्ध साहित्यिकांमधून समितीच्या बैठकांसाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र निवड समितीच नसल्याचे कारण दाखवून कलावंतांना परत पाठवले जात असल्याने कलावंतांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.