केंद्र व राज्य शासन कुष्ठरोग नियंत्रणासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधींचा खर्च करते. परंतु, आजही सगळ्याच जिल्ह्यांत कमी अधिक कुष्ठरुग्ण आढळत आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत दर दहा हजार लोकसंख्येमागे सर्वाधिक कुष्ठरुग्णाचे प्रमाण गडचिरोलीत आहे.राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यांत या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. सध्या या भागात ४ हजार १४५ सक्रिय रुग्ण उपचाराखाली आहेत. सध्या गडचिरोलीत दर दहा हजारांमागे ६ कुष्ठरुग्ण, भंडारात ४, गोंदिया ३, चंद्ररपूर (ग्रामीण) ५, चंद्रपूर (शहर) १, नागपूर (ग्रामीण) २, नागपूर (शहर) १ तर वर्धेत २ कुष्ठरुग्ण असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीत आहे.
हेही वाचा >>>नागपूर: सैन्याला दारूगोळा पुरवणाऱ्या कंपनीवर ‘सायबर हल्ला’
संसर्गक्षम कुष्ठरुग्णांशी संपर्क आल्यास या आजाराचा प्रसार होतो. गरिबी, अज्ञान, निरक्षरता, गर्दी, अस्वच्छता, निकृष्ठ राहणीमान असलेल्या भागात हा आजार जास्त आढळतो. हा आजार अनुवांशिक नसल्याची माहिती, नागपूरातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार यांनी दिली.
हेही वाचा >>>नागपूर : अत्याचार करून तरुणीला ठार मारण्याची धमकी, आरोपीला २० वर्षांची शिक्षा
कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार ‘मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री’ नावाच्या जिवाणूमुळे होतो. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा या राज्यात हे रुग्ण जास्त आहे. बहुविध औषधोपचार प्रणालीमुळे कुष्ठरोगाचे जंतू नष्ट केले जातात. मात्र, लगेच उपचार गरजेचा आहे. या रुग्णांना शासकीय रुग्णालयांत मोफत औषध मिळतात.-डॉ. श्रीराम गोगुलवार, प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर.
उपचाराधीन कुष्ठरुग्णांची संख्या
जिल्हा /शहर रुग्ण
भंडारा ५१५
गोंदिया ४९०
चंद्रपूर (ग्रा.) १,३३१
चंद्रपूर (श.) ५०
गडचिरोली ७९७
नागपूर (ग्रा.) ४८९
नागपूर (श.) १७०
वर्धा ३०३
एकूण नागपूर विभाग ४,१४५