वर्धा : दिवाळी हा प्रकाश सण. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघणारा… दिव्यांची होणारी आरास तर नेत्रदीपक. अंगणात, दारावर, कंपाउंडवर, घरावर, छतावर असे चोहिकडे दिवेच दिवे. मातीचे, मेणाचे आणि असंख्य असे दिवे. प्रकाश देतात आणि वायू पण सोडतात. असे दिवे पर्यावरण साठी किती मारक याचा विचार केल्या जात नाही, अशी भूमिका एक संस्था मांडत आहे.
जिवरक्षक फाउंडेशन हे या कार्यात आहे. ते म्हणतात, हिंदूधर्म ग्रंथात गाईला अतिशय पवित्र मानल्या गेलेले आहे. गोमय वसते लक्ष्मी असं सुद्धा तिला म्हटले जाते. या गाई पासून असंख्य फायदे असल्यामुळे तिला हिंदु धर्मशास्त्रात गो-माता म्हटल्या जाते. गाईच्या शेणा मध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास असतो असं आपलं धर्मशास्त्र सांगत. हे महत्व ओळखून येथील जीवरक्षक फाउंडेशनने गाईच्या शेणापासून दिवाळीचे दिवे तयार केले असून या दिव्यांना प्रचंड मागणी आहे.
दिवाळी म्हटली की गो मातेच्या शेणाचे खूप महत्व आहे. दिवाळीत शेणाचा सडा असो वा पांडव पंचमीला अंगणात शेणाचे पाच पांडव पूर्वी हमखास असायचे. परंतु आता अंगणच हरवत चालल्याने ह्या प्रथा आता जमा होण्यातच उरलेल्या आहेत. परंतु जीवरक्षक फाउंडेशनने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे घरो-घरी गो मातेचे शेण पोहचायला पाहिजे या दृष्टीने गो मातेच्या शेणा पासून दिवे तयार केले आहे. हे दिवे जीवरक्षक फाउंडेशन ने आपल्या संस्थेत तयार करून विक्री साठी उपलब्ध केले आहे.
या नैसर्गिक रित्या तयार केलेल्या दिवे लावल्यास वातावरणात सकारात्मकता सकारात्मक निर्मिती करते. जळत्या दिव्याभोवतीची विषारी वायू काढून टाकते, चांगले आरोग्य राहते, शुद्ध हवा ऑक्सिजन शरीराला प्राप्त करून देते. या दिव्याची विशेष बाब म्हणजे हे दिवे पाण्यावर देखील तरंगतात.
हे दिवे विक्रीसाठी ठेऊन यातून मिळणारे उत्पन्न हे त्या जखमी मुक्या अनाथ गो-मातेला व इतर प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी जीवरक्षक फाउंडेशनला आर्थिक मदत सुद्धा होणार आहे. यासाठी यंदाच्या दिवाळीत जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या गोमय दिव्यांचा उपयोग करावा व वन्य जीव रक्षक फाउंडेशनला मदत करावी असे आवाहन जिवरक्षकचे राकेश झाडे यांनी केले आहे. त्यांच्या जिवरक्षक केंद्रात हें गोमय दिवे विक्रीसाठी उपलब्ध असून नागरिकांनी येत्या दिवाळीत लावण्यासाठी या दिव्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.