नागपूर : शिक्षक असलेल्या आईवडीलांच्या संस्कारात वाढलेली तरुणी उच्चविद्या विभूषित झाली. स्वबळावर नावाजलेल्या आयटी कंपनीत उत्तम पगारावर नोकरीला लागली. मुलगी कर्तत्ववान असली तरी लेक या नात्यानं मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून, जावयाने मागितले ते पुरवले. चंद्रपुरात थाटा माटात लग्नही लावले. मुलगी सासरी मुकुटबनला नांदायला देखील गेली. मात्र सुख तिच्या नशीबात नव्हते.
हुंड्यासाठी छळ सुरू झाला. सासू आणि नणंद घालून पाडून बोलू लागल्या. पती राज बंडेवार हा त्यांच्याच तालावर नाचत गेला. तिच्या संसारात मुलाच्या रुपाने फुलही उमलले. मात्र तरीही छळ थांबेना..! अखेर ती हतबल झाली अन् बेलतरोडी पोलिस ठाणे गाठले. तिथे सासरकडून होत अत्याचाराचा उलगडा झाला. पोलिसही द्रविले. त्यांनी पती व सासरच्या लोकांविरूध्द हुड्यासाठी विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल केला.
ही आपबिती आहे, तेजस्वीनी या अभियंता विवाहितेची. तिचा पती राज बंडेवार मुंबईत जीआो कंपनीत नोकरीला. वर्षाला २५ लाखाचं पॅकेज. तो मुळचा यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी तालुक्यातील धानोरा हे त्याचे गाव.
एमटेक पर्यंत शिकलेली तेजस्विनी मुंबईतील आयटी कंपनीच्या नागपूर शाखेत नोकरीला. दोघांचा नोव्हेंबर- २०२० मध्ये विवाह झाला. नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर छळातून सुटका होईल, असा तिचा समज. तो फोल ठरला. लोभी नवऱ्याने मुलीच्या आईवडिलाकडून बरेच लाभ लाटले. तरीही त्याचा मोह संपेना. दरम्यान गाडी, फर्निचरसाठी तिचा छळ सुरू झाला. आपल्या वेतनातून धक्काही न लागू देणाऱ्या पतीला लोभीपणा तिला खटकत होता.
कोरोना काळात घरून कामामुळे दोघेही गुमगावच्या इंम्पेरिअल इस्टेटमधील घरात राहावयास गेले. तिथे राज आणि सासरच्या लोकांचा आपले रंग दाखवले. सासू ज्योती आणि नणंद सुषमा संगनोड राज छळ करत गेले. यातून विवाहितेला अनेकदा मारहाणही झाली. गरोदरपणातही त्यांनी छळ कमी केला नाही. बाळाच्या चिंतेने विवाहिता २३ एप्रिल२०२३ मध्ये बाळंतपणाला माहेरी आली. तेव्हा सासरी सुरू असलेल्या छळाला पहिल्यांदा वाचा फुटली. हे एकून वडील हादरले.
गरोदरपणात पत्नीला पतीकडून प्रेमाच्या शब्दांची अपेक्षा असते. मात्र छळ सुरूच होता. जूनध्ये विवाहितेचे खाजगी रूग्णालयात बाळंतपण झाले. सुनेच्या बाळंतणानंतरही पती,सासू, सासरे तेजस्विनीची विचारपूस करत नव्हते. मधल्या काळात बाळाची नागपूरच्या एम्समध्ये दोन वेळा शल्यक्रिया देखील झाली. मात्र तरीही नागपूरात राहणारे सासरचे लोक सुनेला भेटण्यासाठी आले नाहीत.
भरोसा सेलचे समुपदेशनही अपयशी
तेजस्विनी व बाळाकडे न पाहणारा लोभी पतीच काय तर सासू सासरेही हुंड्याचा तगादा लावत होते. त्यावरून भांडणेही रोजची झाली. यावरून ८ जूनला समाजाची पंचायत झाली. मधल्या काळात राज बंडेवारचे भरोसा सेलने समुपदेशनही केले. तरी त्याच्यात फरक पडला नाही. भरोसा सेलने अखेर पोलिस तक्रारीचे पत्र दिले. त्यावरून राज बंडेवार ,सासू,सासरा, नंणदेच्या विरोधात बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.