Paid Fellowship For Professors / नागपूर : देशभरातील प्राध्यापकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. एका संस्थेने दरमहा एक लाख रुपयांची फेलोशिप प्राध्यापकांसाठी सुरू केलेली आहे. या संधीचा लाभ घेऊन प्राध्यापकांना विविध क्षेत्रात काम करता येणार असून याचा त्यांच्या शैक्षणिक उपक्रमातील मोठा फायदा होणार आहे. सोबतच त्यांना यासाठी मासिक एक लाख रुपये फेलोशीप दिली जाणार आहेत.

एआयसीटीई फेलोशिप कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या प्राध्यापकांना शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये किमान एक वर्ष उद्योगात काम करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये त्यांना दरमहा एक लाख रुपये मानधन मिळेल, सोबतच त्यांच्या मूळ संस्थेकडून नियमित वेतनही मिळत राहील. हा कार्यक्रम १ डिसेंबर २०२५ पासून सुरू होईल आणि निवड प्रक्रिया १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान चालणार आहे. फेलोशिप कार्यक्रमासाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडेल.

पहिला टप्पा अर्ज मूल्यांकन आणि कागदपत्रे पडताळणीचा असेल. दुसऱ्या टप्प्यात इंडस्ट्रीद्वारे मुलाखत घेतली जाईल. अंतिम टप्पा कागदपत्रे पडताळणीचा असेल. निवड प्रक्रिया १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालेल. प्रशिक्षणाची सुरुवात १ डिसेंबर २०२५ पासून होईल. नोंदणी करण्यासाठी अधिकृत पोर्टल ifp.aicte.gov.in वर भेट द्यावी लागेल. अंतिम गुणवत्ता यादी तीनही टप्प्यांतील एकत्रित कामगिरीवर आधारित असेल.

कोणत्या क्षेत्रात काम करता येणार?

या फेलोशिप कार्यक्रमामुळे निवड झालेल्या प्राध्यापकांना अनेक आधुनिक क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. निवड झालेल्या प्राध्यापकांना प्रगत सामग्री, रेअर-अर्थ आणि क्रिटिकल मिनरल्स, सेमीकंडक्टर्स, स्पेस आणि डिफेन्स, ब्लू इकॉनॉमी, सस्टेनेबिलिटी व क्लायमेट चेंज, एडवांस्ड कंप्यूटिंग (सुपरकंप्यूटिंग, एआय, क्वांटम कंप्यूटिंग), नेक्स्ट-जेन कम्युनिकेशंस, स्मार्ट सिटी व मोबिलिटी, ऍग्रो टेक आणि फूड प्रोसेसिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनुभव घेता येईल. या कार्यक्रमामुळे प्राध्यापकांना नवीन विषयामध्ये अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

पात्रता निकष काय

  • अर्जदाराचे कमाल वय ४५ वर्षे असावे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे.
  • एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेत किमान ५ वर्षांचा शिक्षण अनुभव असावा.
  • डॉक्टोरल/पोस्ट-डॉक्टोरल शोध आणि प्रतिनियुक्तीचा कालावधी यात ग्राह्य धरला जाणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे.
स्नातक/ पदव्युत्तर पदवी आणि गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे.
सध्याच्या आणि पूर्वीच्या नोकरीचा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.
मूळ संस्थेकडून ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.