चंद्रपूर: शेतात काम करीत असलेल्या ईश्वर कुंभारे (४७) या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. चिमूर तालुक्यातील सावरगाव येथे मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे चिमूर परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

गेल्या दोन दिवसापासून पाऊस चांगला पडत आहे. मंगळवारी कुंभारे दाम्पत्य शेतीकाम करीत होते. यावेळी ईश्वर कुंभारे यांच्यावर दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला केला. पत्नीने आरडाओरड करताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागास याबाबतची माहिती देण्यात आली. वनविभागाने तत्काळ घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली. अखेर ईश्वर कुंभारे यांचा मृतदेहच सापडला.

हेही वाचा… ‘लालपरी’ला भरभरून पावली विठुमाऊली! बुलढाणा विभागाला १.३४ कोटींचे उत्पन्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभारे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे नेण्यात आला आहे. यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली होती.