भंडारा : कालपासून जिल्ह्यासह ग्रामीण भागात पाऊस सुरू आहे. शेतावर जाण्यासाठी निघालेल्या एक शेतकऱ्याने टीनावर ठेवलेली छत्री हातात घेतली. मात्र छत्रीला विद्युत प्रवाहित झाल्याने जोरदार धक्का लागून त्याच्या घात झाला. मोहगाव देवी येथील नंदकिशोर राधेश्याम साखरवाडे (वय ४४) असे मृतकाचे नाव आहे.
सकाळी साडेनऊच्या सुमारास नंदकिशोर यांचा भाऊ रविचंद्र साखरवाडे हा शेताकडे जाण्यास निघाला होता. पाऊस असल्याने घराच्या अंगणात असलेल्या टीना जवळील छत्री काढण्यासाठी त्याने हात पुढे केला. त्याला विजेच्या धक्का बसला. हे दृश्य पाहून त्याचा थोरला भाऊ नंदकिशोर साखरवाडे धावून आला. भाऊ रविचंद्र याला करंट लागलेला पाहून नंदकिशोर याला पकडताच रविचंद्र बाजूला पडला. नंदकिशोर छत्रीला आलेल्या विद्युत प्रवाहाला पकडून राहिला. त्यामुळे त्यांचे वडील राधेश्याम यांनी नंदकिशोरकडे धाव घेतली. त्यावेळी वडिलांनाही विद्युत प्रवाहने फेकले गेले.
यावेळी वडिलांना करंट लागल्याचे पाहताच त्यांच्या मुलगा ऋषभ याने तात्काळ विद्युत प्रवाह बंद केला. तोवर उशीर झाला होता. विद्युत प्रवाहाला चिपकून असलेले नंदकिशोर साखरवाडे खाली पडले. वडिलांचा अबोला बघून ऋषभ व त्याची बहीण घरच्या सगळ्यांनीच हंबरडा फोडला. लगेच नंदकिशोर साखरवाडे व भाऊ रविचंद्र राधेश्याम साखरवाडे यांना शासकीय ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे उपचारासाठी नेण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच तेथील डॉक्टरांनी नंदकिशोर साखरवाडे यांना मृत घोषित केले. थोरला भाऊ रविचंद्र राधेश्याम साखरवाडे यांच्यावर उपचार सुरू आहे. मृतक नंदकिशोर साखरवाडे यांच्या मागे दोन भाऊ, वडील, आई, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या वीज धक्का च्या अपघातामुळे घरातील कमावता व्यक्ती गेल्यामुळे मोहगाव देवी येते शोककळा पसरली आहे.
टीनपत्राने केला घात
घरासमोर टीनाच्या पत्रा लावलेल्या आहे. पावसाच्या पाण्यामुळे टीनाला पूर्णतः ओलावा आलेला आहे. टिनाच्या खालच्या भागाला छत्री ठेवली होती. छत्री काढण्यासाठी गेलेल्या नंदकिशोर साखरवाडे यांना विजेच्या धक्का लागला. त्या धक्क्यात त्याच्या मृत्यू झाला.