scorecardresearch

वाशीम : अनोखे आंदोलन, कृषीमंत्र्यांना पाठवणार ‘बेशरम’चे फूल

शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने विमा कंपनीकडे पीक विम्याचे पैसे भरले.

वाशीम : अनोखे आंदोलन, कृषीमंत्र्यांना पाठवणार ‘बेशरम’चे फूल
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू अण्णा इंगोले व शेतकऱ्यांनी ‘बेशरम’चे फूल पाठवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे

शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने विमा कंपनीकडे पीक विम्याचे पैसे भरले. मात्र, पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तूटपुंजी मदत मिळत आहे. अनेक शेतकरी पीक विम्यासाठी कार्यालयात चकरा मारत आहेत. शेतकरी आर्थिक संकटात असताना जिल्ह्यातील पीक विमा कार्यालयच बंद असल्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू अण्णा इंगोले व शेतकऱ्यांनी ‘बेशरम’चे फूल पाठवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>भंडारा: रानटी हत्तींचा मुक्काम मोहघाटा जंगलात, पश्चिम बंगालच्या पथकाचेही कळपावर बारीक लक्ष

जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार ३०३ शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यापैकी २ लाख ११ हजार ६५० शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला. तर १८ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा नामंजूर करण्यात आला. त्यामुळे २०० कोटींची गरज असून केवळ ६५ कोटी जमा झाले. मात्र, विमा कंपनी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत आहे. किमान शेतकऱ्यांना १८ हजार नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असताना केवळ ७०,८०,१०० अशाप्रकारची मदत मिळत आहे. अनेक शेतकरी विमा कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु, जिल्ह्यातील पीक विमा कंपनीचे कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. कृषी मंत्रालयाच्या जिल्ह्यात विमा कंपनीचे कार्यालय बंद असून किमान शेतकऱ्यांना १८ हजार नुकसान भरपाई द्यावी. विमा कंपनीचे कार्यालय सुरू ठेवावे आदी मागण्यांसाठी दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:31 IST

संबंधित बातम्या