वर्धा: तळेगावलगत शिरकुटणी येथे आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी आता तपासानंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील उमेश शेषराव राऊत हा युवक बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलीसांना दिली होती. मात्र पोलीसांना तो मृतावस्थेत आढळून आला होता.

शरीरावर जखमा तसेच गळा आवळल्याचे दिसून आले. मात्र मृतच्या वडिलांनी वेगळीच तक्रार दिली होती. मुलगा नेहमी दारु पिऊन वाद घालतो. त्यामुळेच त्याच्या पत्नीने पण घटस्फोट घेतला. आता तो रोज लग्न लावून द्या, म्हणून भांडण करतो. २३ ऑक्टोंबर रोजी सकाळीच मद्यपान करीत त्याने आईला शिवीगाळ केली. या दरम्यान तो तोल जाऊन पडला. तसेच बैल बांधायचा दोर गळ्याभोवती आवळून, लग्न करून द्या नाही तर आत्महत्या करतो, अशी धमकी देवू लागला. असे वडिलांनी सांगितले.

हेही वाचा… वाघाच्या मृत्यूबाबत काय म्हणाले वनमंत्री..? वनाधिकाऱ्याना दिले “हे” निर्देश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतदेह पुढील तपासणी साठी पाठविण्यात आला. तेव्हा ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले. ठाणेदार संतोष धोबे यांनी लगेच वडील शेषराव राऊत व काकू कल्पना केशव राऊत या दोघांना अटक केली.