नांदुरा शहरात शनिवार, ४ मार्च रोजी विविध संघटनांच्यावतीने सकल हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. याप्रकरणी माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह १८ पदाधिकाऱ्यांवर नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच काल रात्री झालेल्या दगडफेकप्रकरणी ३० व्यक्तिंविरुद्धसुद्धा कारवाई करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे नांदूऱ्यात तणावसदृश्य परिस्थिती असून पोलीस यावर बारकाईने नजर ठेवून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अमरावती: फडणवीस यांच्‍या ताफ्यासमोर ‘स्‍वाभिमानी’च्या कार्यकर्त्‍यांची निदर्शने

जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा १९५१ (कलम ३७ (१) अन्वये अधिसुचना व कलम ३७ (३) अन्वये आदेश जारी केला आहे. जिल्ह्यात आदेश लागू असताना मोर्चा आयोजकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून विनापरवानगी हिंदू जन आक्रोश मोर्चा वाजतगाजत ध्वनीक्षेपकासह काढला. तसेच आक्षेपार्ह घोषणाबाजी करून आणि काहींनी प्रक्षोभक भाषण करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी नांदुरा पोलीसांनी माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह इतर १८ पदाधिकाऱ्यांविरुद्ध कलम १४३, १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहे.

हेही वाचा >>> बुलढाणा: पेपरफूट प्रकरणी पाच आरोपी गजाआड, मुख्य सूत्रधार सापडेना

दरम्यान, मोर्चातील काही घोषणांवर विशिष्ट समाजातील युवकांनी आक्षेप घेतला. नांदुरा पोलीस ठाण्यासमोर २०० ते ३०० लोकांनी काहीवेळ  ठिय्या धरला. ठाणेदार अनिल बेहराणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संयम ठेवत त्यांची समजूत घालून परत पाठविले. मात्र काही युवकांनी परत गैरकायद्याची मंडळी जमवून जमावाला चिथावणी देत त्यांच्या भावना भडकविल्या. संतप्त जमाव हातात दगड, विटा, लाठ्या, काठ्या घेऊन अन्य धर्मियांच्या वस्तीवर चाल करून गेला. यावेळी त्यांनी दगडफेक केली. नांदुरा पोलीसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत हल्लेखोरांना पांगवत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यामुळे संभाव्य संघर्ष टळला. याप्रकरणी पोलीसांच्या वतीने फिर्याद देण्यात आली. त्यानुसार ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against former mla chainsukh sancheti and 18 other for stone pelting in hindu janakrosh morcha scm 61 zws
First published on: 05-03-2023 at 19:11 IST