गोंदिया: गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळच्या सुमारास ओपीडी सुरू असताना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घडली.
आग लागल्याची माहिती कळताच उपचाराकरिता आलेल्या रुग्ण आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाची पळापळ सुरु झाली. रुग्णालय परिसरातील प्रत्येक जण मिळेल त्या जागी पळण्याचा प्रयत्न करत असताना दिसून आले. दरम्यान एका रुग्णासोबत आलेल्या एकाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळच्या सुमारास ओपीडी सुरू असताच जवळच शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे काही वेळातच आग लागली आणि संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती होताच लोकांची धावपळ सुरू झाली. या आगीच्या घटनेमुळे शासकीय रुग्णालयातील सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा येरणीवर आला आहे. दरम्यान संपूर्ण रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. काही वेळासाठी संपूर्ण रुग्णालयात धूर झाला होता. मात्र वेळेवर अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांनी शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले आणि परिसरातील रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी सुटकेच्या नि: श्वास घेतला.
दरम्यान संपूर्ण परिसरातील इलेक्ट्रॉनिक उपक्रम बंद करण्यात आले. मात्र शॉर्टसर्किट ने लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात चेतावणी स्वरूप कोणतेही अलार्म वाजले नसल्यामुळे लोकांत एकच संभ्रम होता की एवढा मोठ्या शासकीय, महाविद्यालयात, रुग्णालयात अलार्म अलर्ट नसल्यामुळे रुग्णालयातील कारभारावर ही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काही दिवसापूर्वी गोंदिया शासकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पण मागच्या आठवड्यात अशाच प्रकारे इलेक्ट्रिकचे तार जळून आग लागल्याची घटना घडली होती.
तर फायर ऑडिट न झालेल्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ष २०२१-२२ मध्ये पण शॉर्टसर्किट मुळे बाल रुग्ण कक्षात आग लागल्याची घटना घडली होती आणि या मोठ्या घटनेत ११ चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला होता. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा वैद्यकीय शासकीय महाविद्यालय अशा ठिकाणी शॉर्टसर्किट मुळे होणाऱ्या आगी च्या घटनेमुळे या रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेच्या प्रश्न अशा घटनांमुळे ऐरणीवर आलेला आहे.
आज मंगळवारी सकाळच्या सुमारास ओपीडी सुरू असताना जवडील एका ठिकाणी आग लागल्याची घटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात घडली होती. वेळेतच रुग्णालयातील कर्मचारी आणि अग्निशमन विभागाला पाचरण करून ती आग विझवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. –डॉ. कुसुमाग्रज घोरपडे अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गोंदिया