नागपूर : नागपूर शहरामध्ये लक्ष्मीपुजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे रात्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी हा ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील मोठी आग ही लक्ष्मीनगरमधील आठ रस्ता चौक येथील रिलायन्स स्मार्ट स्टोरलाला लागली. त्यात स्टोअर भस्मासात झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीत स्मार्ट स्टोरमधील संपूर्ण साहित्य जळून राख झाले. तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशाम दलाला आग विझवण्यात यश आले आहे. मात्र या आगीत लाखो रुपयाच्या मालमत्तेचे मोठं नुकसान झाले आहे. या व्यतिरक्त छोट्या छोट्या आगीच्या पाच घटना शहराच्या वेगवेगळ्या भागातून पुढे आल्या. ज्यात कचऱ्याला आग लागणे, झाडाला आग लागणे अशा घटना घटनांची अग्निशमन दलाकडे नोंद झाली.
दिवाळीच्या सणात आठ रस्ता चौकाजवळील रिलायन्स स्मार्ट स्टोअरला मंगळवारी (२१ ऑक्टोबर) रात्री उशिरा अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक रहिवासी परिसरात फटाके फोडत असताना एक फटाका बंद स्टोअरच्या आत जाऊन पडल्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिवाळी निमित्ताने हे स्टोअर संध्याकाळी लवकर बंद करण्यात आले होते.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे मालमत्ता आणि वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीमुळे घनदाट धुराचे लोट स्टोअरमधून बाहेर येत होते आणि काही क्षणांतच संपूर्ण इमारतीने आगीचे रौद्ररूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे अनेक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने अनेक तास प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. आग शेजारच्या इमारतींपर्यंत पसरू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली.सध्या या आगीचे नेमके कारण आणि एकूण नुकसान किती झाले याचा तपास पोलीस आणि अग्निशमन विभाग करत आहेत.