अमरावती: आज देशात भविष्‍याचा वेध घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची गरज आहे. मी जेव्‍हा देशात पाण्‍यावर उतरणारे विमान आणले, तेव्‍हा सगळे मला हसत होते, की हे कसे शक्‍य होईल. मी विमान आणले. मुंबईच्‍या समुद्रात या विमानाने उतरलो. यशस्‍वी प्रयोग झाला.

मला एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. ते म्‍हणाले, की सरदार सरोवरापासून मला या विमानात जायचे आहे. ते विमान तुम्‍ही उपलब्‍ध करून द्या. मी लगेच होकार दिला. काही वेळानंतर मला पंतप्रधानांच्‍या खासगी सचिव, सुरक्षा अधिकाऱ्यांचे फोन आले. पाण्‍यावर उतरणाऱ्या विमानाला एकच इंजिन आहे आणि आपल्‍या कायद्यानुसार पंतप्रधानांना या विमानातून प्रवास करू देता येणार नाही. आपण पंतप्रधानांची समजूत काढावी, अशी विनंती त्‍यांनी केली.

हेही वाचा… VIDEO: ताडोबातील वाघालाही श्रावणाचे वेध; व्हिडीओ होतोय व्हायरल…

मी पंतप्रधानांशी संपर्क साधला, त्‍यावर ते म्‍हणाले, नितीनजी आपण नियम मोडण्‍यात सर्वात आघाडीवर असताना आता तुम्‍हीच मला नियम शिकवण्‍याची गोष्‍ट कशी काय करता. मी त्‍यांना सांगितले, आपण बरोबर आहात. एका इंजिनचे हे विमान सुरक्षित आहे. आपण नक्‍कीच या विमानातून प्रवास करावा. मग, पंतप्रधान देखील या विमानातून गेले.

हेही वाचा… आरोग्य उपसंचालक पदाच्या परीक्षेत खुल्या वर्गावर अन्याय; किमान पात्रता गुणात अनियमितता झाल्याची…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरी म्‍हणाले, सी-प्‍लेन हे पाण्‍यावर आणि धावपट्टीवर दोन्‍ही ठिकाणी उतरू शकते. मी विमानतळ प्राधिकरणाच्‍या अधिकाऱ्यांना यासंदर्भात कायदा करण्‍यास सांगितले. सहा महिने त्‍यांनी काहीच हालचाल केली नाही. एक दिवस मी त्‍यांना बोलावून सांगितले, की तुम्‍ही ज्‍याला सी-प्‍लेन म्‍हणता, त्‍याला मी फ्लाइंग बोट म्‍हणतो. हवेत उडणारी बोट. आता तुम्‍ही एका महिन्‍यात कायदा बनवा, अन्‍यथा माझा समांतर कायदा संसदेत जाईल. मी ‘फ्लाइंग बोट अ‍ॅक्‍ट’ तयार करेन, असा इशाराच त्‍यांना दिला. त्‍यांनी एका महिन्‍यात अ‍ॅक्‍ट तयार केला. आता एक कंपनी अशी शंभर विमाने विकत घेत आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.