संमेलनातील वाङ्मयीन चर्चा किती खुमासदार, रंगतदार होईल हे पुढचे पुढे ठरेलच. मात्र, संमेलनातील तीनही दिवसांचा भोजनबेत मात्र आताच ठरला आहे. जिव्हेच्या विविध कडांचा रसास्वाद पूर्ण करणारा हा बेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दहा विविध प्रकारचे मिष्ठान्न तृप्तीची ढेकर देण्यास पुरेसे ठरणारे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी तीन फेब्रुवारीला सकाळी नाष्ट्यात उत्तपम, गार्डन इडली, मैसूर वडा, बनारसी चुरामटर व दालबदाम शिरा राहणार आहे. दुपारच्या जेवणात पनीर अकबरी, वेज कोल्हापुरी, डाळफ्राय, मिस्सीपुरी, मिस्सीपराठा, स्ट्रॉबेरी रसमलाई, मावावाटी, दहीवडा व कॉर्नकटलेट आहे. रात्रीच्या जेवणात लच्छेदार रबडी, केसरकाॅईन जलेबी व सीताफळ छेनापाईज हे तीन मिष्ठान्न, तसेच अन्य पदार्थांत इंदुरी दहीवडा, मिक्स पकोडे, कढाई पनीर, मेथी मटर मलाई व हैदराबादी वांगे राहणार. शिवाय साेबतीला झुनका, बिस्कीट भाकर, कढी, दाळ मखनी, गट्टे पुलाव, वाफवलेला भात, मिनी तंदुरी, फुलका, मिस्सीपुरी व स्टिक मलाई कुल्फी आहे.

हेही वाचा – सजलेल्या ताटातला पहिला घास गरजूंना; नागपूरातील ‘विष्णूजी की रसोई’ ची मानवीय परंपरा

दुसऱ्या दिवशी चार फेब्रुवारीला सकाळी नाष्ट्यात इंदोरी पोहा, चना मोट, तिखट चिवडा, मिनी आलुकोफ्ता व वेजी सेन्डविच आहे. या दिवशी शनिवार म्हणून उपवास असणाऱ्यांसाठी भगरपुलाव, दही, साबुदाणा वडा, फराळी चिवडा व विलायची केळी मिळणार. दुपारच्या जेवणात फ्रुट श्रीखंड, गुलाबजामून, मिश्रदालवडा, मटर कचोरी, मटर पनीर, सावजी कोफ्ता, दाळभाजी, दाळतडका, दमतवा सावजी व फुलके असा बेत आहे.

उपवासास राजगिरा पुरी, आलुशिरा, आलुसाग, फ्रेश फ्रुट, साबुदाणा खिचडी ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या जेवणात पुरणपोळी, केसर रसगुल्ला, वेजकटलेट, जोधपुरीवडा, पनीर बटर मसाला, मलाईकोफ्ता, सेवटमाटर, दालजीरा, दालतडका, व्हेज बिर्यानी, फुलका, मिनीतंदुरी, बटर पोळी असे ताट सजणार.

हेही वाचा – नागपूर : औषध उद्योगांमुळे ‘५ ट्रिलीयन डॉलर’ची अर्थव्यवस्था शक्य, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

पाच फेब्रुवारीला नाष्ट्यात ब्रेडरोल, बडवापुरी, आलुकोहळे साग, व्हेज उपमा, चटणी, दिलजानी असा आहार आहे. तर दुपारच्या जेवणात फ्रुट कस्टर्ड, खवापुरी, मिनी मटर काेफ्ता, मद्रासी पकोडा, पनीर पसंदा, काश्मिरी कोफ्ता, दाळयलो, दाळ फंटीयर, वाफवलेला भात, मसाला पुलाव व कढी असा मुख्य बेत आहे. रात्रीस केसर चमचम, ड्रायफ्रुट हलवा, पंप मटर, सावजी पनीर, मसाला वांगे, आलूमेथी मटर, दाळतडका, स्पेशल पुलाव, फुलका व दोन प्रकारचा पराठा राहणार. संमेलनाच्या पूर्वसंध्येला दोन फेब्रुवारीला येणाऱ्यांना जलेबीसह साधे जेवण मिळणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food akhil bharati marathi sahitya sammelan in wardhe was a success pmd 64 ssb
First published on: 21-01-2023 at 10:25 IST