scorecardresearch

Premium

संविधानाच्या सन्मानार्थ प्रथमच नागपुरात पथसंचलन व गणसभा

२०२५ मध्ये भारताच्या राज्य घटनेला तसेच गणराज्य लोकशाहीला ७५ वर्षे होत आहेत. हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने रविवार २२ ऑक्टोबरला भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ संविधान प्रबोधकांचे पथसंचलन व गण सभा आयोजित केली जाणार आहे.

Nagpur street pathsanchalan
संविधानाच्या सन्मानार्थ प्रथमच नागपुरात पथसंचलन व गणसभा (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नागपूर : २०२५ मध्ये भारताच्या राज्य घटनेला तसेच गणराज्य लोकशाहीला ७५ वर्षे होत आहेत. हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने रविवार २२ ऑक्टोबरला भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ संविधान प्रबोधकांचे पथसंचलन व गण सभा आयोजित केली जाणार आहे. हे पथसंचलन सकाळी १० वाजता दीक्षाभूमी व उंटखाना येथून निघून संविधान चौक येथे एकत्रित होणार आहे.

संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, संविधान उद्देशिका स्तंभ व गोवारी शाहिद स्मारक येथे मानवंदना देऊन पुढे इंदोरा मैदानात जाईल व तेथे पथसंचालनाचे गणसभेत रुपांतर होणार आहे. इंदोरा मैदानात दुपारी २ वाजता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गणोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व उपस्थित संविधान प्रबोधकांद्वारे सन्मान अभिवादन होणार आहे.

Mallikarjun Kharge writes to Mamata Banerjee requesting security for Bharat Jodo Nyaya Yatra
‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरक्षा पुरवावी! मल्लिकार्जुन खरगे यांची ममता बॅनर्जीना पत्र लिहून विनंती
Application by Foreign Creditors for Bankruptcy of Byju to Bangalore Bench of National Company Law Tribunal print economic news
परकीय देणेकऱ्यांकडून ‘बायजू’च्या दिवाळखोरीसाठी अर्ज; राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या बंगळूरु खंडपीठाकडे धाव
Elon Musk Narendra Modi
एलॉन मस्क यांनी भारतासाठी उठवला आवाज, UN च्या कारभारावर बोट ठेवत म्हणाले…
Survey of Congress candidates for Lok Sabha in Pune begins
लोकसभेसाठी पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवारांचे सर्वेक्षण सुरू; ‘या’ तारखेपर्यंत होणार उमेदवार निश्चित

हेही वाचा – वर्धा : ऑनलाईन कामे करणार नाही म्हणत ठिय्या आंदोलन सुरू

हेही वाचा – बुलडाणा : तलाठी अहिर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पटवारी संघाचे धरणे

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश, संविधान फाउंडेशनचे संस्थापक ई. झेड. खोब्रागडे, बौद्ध महिला मैत्री संघ, नागपूरच्या अध्यक्ष पुष्पा बौद्ध, संविधान संगीति महाराष्ट्रचे संयोजक संभाजी भगत उपस्थित राहणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: For the first time in nagpur street pathsanchalan and gansabha in honor of the constitution cwb 76 ssb

First published on: 19-10-2023 at 16:36 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×