वर्धा : बारा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या मजुराला अखेर गडचिरोली जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सध्या गहू, चना पिकांच्या मळणीचे काम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यात मजूर अपुरे म्हणून परजिल्ह्यातील मजूर आणून कामे केली जात आहेत.

सेलू तालुक्यातील एका गावात मळणी यंत्रावर काम सुरू आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील चुरमोरा गावचा सुरज हेमराज कांबळे हा रोजमजुरीवर कामाला आला होता. घटनेच्या दिवशी एक बारा वर्षीय बालिका अंगणात खेळत होती. आजूबाजूला कोणीच नसल्याचे पाहून आरोपी सुरजने तिला शेतात नेले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हेही वाचा – नागपूर : पुरुष मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून महिलेला जीवदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – उपराजधानीचे कृत्रिम सौंदर्य दाखवण्यासाठी अनेकांच्या पोटावर पाय!

बालिका घरी पोहोचल्यावर ती घाबरलेली दिसल्याने आईने विचारपूस केली. काही वेळाने परत विश्वासात घेऊन विचारल्यावर बालिकेने झालेला प्रकार सांगितला. याबाबतची तक्रार सेलू पोलिसांत करण्यात आली. तपास सुरू झाल्यावर आरोपी सूरजला त्याच्या राहत्या गावातून अटक करण्यात पोलीस यशस्वी ठरले.